गुणोत्तर व प्रमाण
📈 गुणोत्तर -
गुणोत्तर म्हणजे नेमके काय तर दोन संख्या भागाकाराच्या रूपात संक्षिप्त लिहणे होय.
उदाहरणार्थ -
35 चे 80 शी गुणोत्तर किती ?
स्पष्टीकरण -
35 35 7
---------- = --------- = -----
80 80 16
35 चे 80 शी गुणोत्तर = 7 :16 होय.
वाचण = 7 स 16 असे करतात.
गुणोत्तर लिहणात हे
चिन्ह वापरतात ➡ ( : )
🌅गुणोत्तर करताना काही नियम🌅
📌 गुणोत्तर करताना ज्या दोन राशी किंवा संख्या दिलेल्या असतात त्यांची एकक समान करूनन घेवूनच गुणोत्तर करावीत.
📌 गुणोत्तर केलेल्या उत्तरास कोणतेही एकक नसते.
------------------------------------------------------
🌅 प्रमाण 🌅
प्रमाण म्हणजे च संख्या प्रमाणात आहेत कि नाहीत हा भाग आपण अभ्यासणार आहोत.
⭕ व्याख्या -
a, b , c या तीन संख्या तेव्हा प्रमाणात / प्रमाणित असतील जेव्हा ....
b² = a × c असेल .
---------------------------------------------
a, b, c, व d या चार संख्या तेव्हा प्रमाणात / प्रमाणित असातील जेव्हा ..........
a × d = b × c असेल .
यालाच परंपरित प्रमाणात असाही शब्द वापरतात.
----------------------------------------------
📌उदाहरणार्थ -
1) 9, 12 , 16 या संख्या प्रमाणात आहेत का ?
स्पष्टीकरण -
येथे a = 9 , b = 12 , c = 16
b² = 12² = 144
a × c = 9 × 16 = 144
म्हणून .....b² = a × c
9, 12 , 16 या संख्या प्रमाणात आहेत .
📌 उदाहरणार्थ -
8 , 12 , 20 , 30 या संख्या प्रमाणात आहेत का ?
स्पष्टीकरण -
येथे.... a = 8 , b = 12
c = 20 व d = 30 होय .
a × d = 8 × 30 = 240
b × c = 12 × 20 = 240
म्हणून .....a × d = b × c
a, b, c, d या प्रमाणित संख्या आहेत ?
-------------------------------------------------
🌅 सरावासाठी उदाहरणे 🌅
1) 3 तासाचे 4 तास 24 मिनीटा शी गुणोत्तर किती ?
2) 4 , 5 , 6 या संख्या प्रमाणात आहेत का ?
3) 15 , 30 , x , 50 या चार संख्या प्रमाणात असतील तर x ची किंमत शोधा ?
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.