Maths Riders

Maths Solution,maths,MPSC,Police Bharti,Talathi,महाराष्ट्र शिक्षक भरती,Talathi Bharti,Bharti, स्पर्धा प्ररिक्षा गणित

05 May 2021

trokonache prakar

  Asp.Net CS By Example       05 May 2021
त्रिकोणाचे प्रकार
समभुज त्रिकोण:

तिन्ही बाजू समान लांबीच्या असणाऱ्या त्रिकोणास समभुज त्रिकोण म्हणतात. या त्रिकोणाचे तीनही कोन समान मापाचे, म्हणजेच प्रत्येकी ६० अशांचे असतात.
समद्विभुज त्रिकोण:

त्रिकोणाच्या तीन बाजूंपैकी दोन बाजूंची लांबी सारखीच असेल तर त्या‍ त्रिकोणास समद्विभुज त्रिकोण म्हणतात. समान बाजूंसमोरील कोन समान असतात, म्हणजेच या त्रिकोणातले दोन कोन सारख्या मापाचे असतात, आणि तिसरा वेगळ्या मापाचा.



विषमभुज त्रिकोण:

सर्व बाजू असमान लांबीच्या असणाऱ्या त्रिकोणास विषमभुज त्रिकोण म्हणतात. या त्रिकोणाचे कुठलेही दोन कोन समान मापाचे नसतात.

लघुकोन त्रिकोण:

या त्रिकोणात प्रत्येक कोन ९० अंशाहून कमी मापाचा असतो.
विशालकोन त्रिकोण:

या प्रकारच्या त्रिकोणाचा एक कोन विशालकोन (९० अंशापेक्षा मोठा) असतो.
काटकोन त्रिकोण:


या प्रकारच्या त्रिकोणात एक काटकोन असतो. काटकोनासमोरील बाजूला कर्ण म्हणतात. कर्णाची लांबी उरलेल्या दोन बाजूंमधील प्रत्येक बाजूपेक्षा जास्त असते. इतर दोन बाजू पाया आणि उंची दर्शवतात, त्यामुळे त्यांची लांबी माहीत असल्यास त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढता येते. प्रसिद्ध "पायथागोरसचा सिद्धांत" याच त्रिकोणास लागू होतो. त्या सिद्धांतानुसार या त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजू माहीत असल्यास तिसरी बाजू आणि सर्व कोनांची माहिती मिळू शकते. काटकोनाव्यतिरिक्त आणखी एक कोन आणि तीन बाजूपैकी एक बाजू माहीत असली तरी, तिसरा कोन आणि इतर दोन बाजूंची माहिती काढता येते.
logoblog

Thanks for reading trokonache prakar

Previous
« Prev Post

No comments:

Post a Comment

Please do not enter any spam link in the comment box.