घड्याळ वेळ व प्रतिमा संख्या
🔆घटक - प्रतिमा🔆
अनेकदा परीक्षेत पाण्यातील प्रतिमा किंवा आरश्यातील प्रतिमा ओळखा असे प्रश्न येतात.
🔰 प्रतिमा ओळखणे उपक्रम
📌 विद्यार्थ्यांना आरसा स्वतः वापरून सुरवातीला ...अंक , इंग्रजी अद्याक्षर , भुमीती आकृत्या कशा दिसतात याचे निरीक्षण करायला लावावे.
📌 प्रत्यक्ष आकार व आरश्यातील किंवा पाण्यातील प्रतिमा ...नेमका बदल शोधने.
📌 आरश्यात जसेच्या तसे दिसणारे अक्षर शोधणे ...मुले आवडीने हा उपक्रम करतील.
एकूण 11 अक्षरे आहेत जे आरश्यात बदलत नाहीत .
> A , H , I , M , O , T , U , V
W , X Y
👆🏼👆🏼👆🏼👆🏼 हे अक्षर असेच आरश्यात दिसतील .
_______________________________
🔆 घड्याळ वेळ आरश्यात 🔆
उदाहरणार्थ - घड्याळात 4: 40 ही वेळ आरश्यात पाहिली तर किती दिसेल ??
स्पष्टीकरण -
यासाठी अगदी सोपे सुञ आहे . दिलेली वेळ 11:60 मधुन वजा करणे.
11 : 60
- 4 : 40
-------------
7 : 20
म्हणून 4: 40 ही वेळ आरश्यात 7:20 अशी दिसेल.
--------------------------------------------------
🔆 दोन आरश्यात प्रतिमा किती 🔆
दोन आरश्यातील कोन दिला जातो व प्रतिमा किती तयार होतील असा प्रश्न विचारतात .
📌 सुञ -
आरश्यातील एकूण प्रतिमा
360°
= ----------------------- - 1
दोन आ. कोन
📎उदाहरणार्थ -
दोन आरश्यात 30° चा कोन असेल तर एकूण प्रतिमा किती मिळतील ?
स्पष्टीकरण -
एकूण प्रतिमा संख्या
360
= ---------------------- - 1
दोन आ. कोन
360
= ---------------- - 1
30
= 12 - 1 = 11
म्हणून 11 प्रतिमा तयार होतील.
No comments:
Post a Comment
Please do not enter any spam link in the comment box.